नगर : गलिच्छ राजकारणामुळे तरुण वर्ग दूर झाला | पुढारी

नगर : गलिच्छ राजकारणामुळे तरुण वर्ग दूर झाला

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : आदिवासी चळवळीतील वाढलेला कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे. ज्या संघटनेबरोबर बांधिलकी झाली. त्यांच्याशी एकनिष्ठ राहतो. सध्याचे राजकारण हे दूषित झाले आहे. एकमेकांशी विश्वासार्हता संपल्याने या गलिच्छ राजकारणामुळे तरुण वर्ग हा दूर होत असल्याने भविष्य व विकासात्मक दृष्टीने धोका असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागीय माडा महामंडळाचे अध्यक्ष तथा एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील लोहारे, कवठेमळेश्वर, मनोली, उंबरी, बाळापूर, ओझर बुद्रूक, ओझर खुर्द, कनोली, शेडगाव, हनुमानवाडी, प्रतापपुर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रूक या गावांमध्ये एकलव्य संघटनेची स्थापना करत आश्वी खुर्द येथील आदिवासी मेळाव्यात तेे बोलत होते.
यावेळी किरण ठाकरे, भाऊराव पवार, अनिल बर्डे, आशिष शेळके, प्रा. अनिल मुन्तोडे, आदी उपस्थित होते.

ढवळे म्हणाले की, आम्ही आदिवासी समाजात वाढलो. आमची जडणघडण झाली अशा समाजातील कोणत्याही व्यक्तींवर संकट आल्यास आदिवासी चळवळ भक्कमपणे उभी राहते. न्याय मिळवून देतो. शिवसेना हा सक्षमपणे असणारे संघटित पक्ष आहे. या पक्षाला कोणीही संपवू शकत नाही. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेशीच एकसंध राहणार आहे.

Back to top button