नगर : गाई बांधण्यावरून पती- पत्नीला काठीने मारहाण | पुढारी

नगर : गाई बांधण्यावरून पती- पत्नीला काठीने मारहाण

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : गोठ्यात बांधलेल्या गाईला गावठाणच्या जागेत बांधले म्हणून एका महिलेला काठीने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. ही घटना राहुरी तालुक्यातील रामपूर येथे घडली आहे.

निर्मला दीपक पठारे (वय 35, रा. रामपूर) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 3 जुलै रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान निर्मला पठारे व त्यांचे पती आरोपींना म्हणाले की, तुम्ही वापरत असलेला गोठा आमच्या वाट्याला आला आहे. आम्हाला जनावरे बांधण्यासाठी जागा नाही. तुम्ही गोठा खाली करा. आरोपीने गोठा खाली न केल्याने निर्मला पठारे यांनी आरोपींची गाय गावठाणच्या जागेवर बांधली. तेव्हा आरोपींनी निर्मला पठारे व त्यांच्या पतीला काठीने मारहाण केली, तसेच शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर निर्मला दीपक पठारे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मिनीनाथ बाबासाहेब पठारे व अर्चना मिनीनाथ पठारे (दोघे रा. रामपूर) या तिघांविरोधात गुन्हा मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक देविदास कोकाटे करीत आहेत.

Back to top button