नगर : शेडगावला सात हजार वृक्षलागवडीचा संकल्प | पुढारी

नगर : शेडगावला सात हजार वृक्षलागवडीचा संकल्प

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेडगाव येथे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वृक्षलागवडीचा संकल्प केल्याची माहिती सरपंच संध्या शेंडे यांनी दिली. गावाच्या हद्दीत येत्या पंधरा दिवसांत सात हजार वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न आहे.त्याचा प्रारंभ काळ 1 जुलै पासून करण्यात आला.

सरपंच शेंडे म्हणाल्या की, माजी सरपंच विजय शेंडे यांनी विविध योजनांतून गावात वृक्षलागवड करीत त्याचे संगोपन केले. आज हे वृक्ष डोलदार उभे आहेत. यामुळे गावाची ओळख ग्रीन शेडगाव अशी होत आहे.

यावर्षी ग्रामपंचायतीने सात हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. एक व्यक्ती एक वृक्ष अशी योजना चालवली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वृक्षलागवड सुरू केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. माणिक लाखे, स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक सत्येंद्र पांडे, बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे, उपसरपंच सोनाली भदे, विजय रसाळ, डॉ. अमोल झेंडे, अशोक शेंडे, शाहूराज भोपळे, सोमनाथ झेंडे, दिगंबर गवळी, विलास रणसिंग, लिंबाजी रसाळ, किसनराव बेलेकर, कारभारी बेलेकर, बिभीशन राऊत उपस्थित होते.

Back to top button