नगर :  बँक खात्यातून 23 हजार लंपास | पुढारी

नगर :  बँक खात्यातून 23 हजार लंपास

नगर :  नगर अर्बन बँकेच्या मार्केटयार्ड भागातील शाखेत एमएसईबीचे निवृत्त अधिकारी यांच्या बँक खात्यातून 23 हजार रूपये परस्पर लंपास केल्याची घटना उघडकिस आली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कनकमल चांदमल गुगळे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे.

गुगळे यांचे अर्बन बँकेत 40 वर्षांपासून बचत खाते आहे. मात्र गत काही वर्षापासून या खात्यातून त्यांनी कोणताही व्यवहार केला नव्हता. दरम्यान खात्यात असलेले 23 हजार रूपये परस्पर काढून घेण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.

Back to top button