राहुरी : प्रेमासह अनैतिक संबंधास नकार दिल्याने विवाहितेवर अत्याचार | पुढारी

राहुरी : प्रेमासह अनैतिक संबंधास नकार दिल्याने विवाहितेवर अत्याचार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : प्रेमासह अनैतिक संबंधास नकार दिल्याने 27 वर्षीय विवाहितेवर घरात घुसून एकाने अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. ही घटना 7 जून रोजी राहुरी शहर हद्दीत घडली. किरण रावसाहेब फुलसौंदर राहुरीतील तनपुरेवाडी येथे राहतो. दि. 2 जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या घटनेतील विवाहित तरूणी तनपुरेवाडी रोड परिसरातील राई आई मंदिराजवळ असताना किरण फुलसौंदर तेथे गेला.

तो तिला म्हणाला, ‘तू मला खूप आवडते. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी संबंध ठेव.’ यावर विवाहित तरूणी नकार देत तेथून निघून गेली. यानंतर 7 जून रोजी ती विवाहिता घरात एकटी असल्याचे पाहून किरण फुलसौंदर तिच्या घरात घुसला. तिचे तोंड दाबून धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. सात ते आठ दिवसानंतर त्याने पुन्हा धमकी देत राहुरी बसस्थानका समोरील एका लॉजमध्ये तिला नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला.

यानंतर 30 जून रोजी किरण फुलसौंदर याने तरूणीच्या पतीच्या मोबाईलवर वारंवार फोन केला. पतीने वारंवार येणार्‍या फोनबाबत तिला विचारणा केली. तेव्हा घडलेला सर्व प्रकार तिने पतीला सांगितला. यानंतर विवाहितेने राहुरी पोलिसात फिर्याद दिली. किरण रावसाहेब फुलसौंदर (रा. तनपूरेवाडी, राहुरी) याच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करुन, त्याला गजाआड केले आहे.

Back to top button