नगर : दिवंगत पत्रकाराच्या घरी घरफोडी | पुढारी

नगर : दिवंगत पत्रकाराच्या घरी घरफोडी

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या खुनाची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून काही चोरट्यांनी 80 हजारांची रोख रक्कम व अडीच तोळे सोन्यासह काही कागदपत्रे चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सामजिक कार्यकर्ते दातीर यांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे, लाल्या ऊर्फ अर्जुन माळी, लाला तौफिक शेख व अक्षय कुलथे यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी या प्रकरणात अक्षय कुलथे यास काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता.

नुपूर शर्मांना पाठिंब्याची पोस्ट टाकणार्‍याचा गळा चिरून खून

दरम्यान, दि. 29 जून रोजी दातीर यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने सर्व जण कुरणवाडी (ता. राहुरी) येथे मुक्कामी गेले होते. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडत घरात प्रवेश केला. सकाळी घरफोडी झाल्याचे समजताच दातीर कुटुंब दाखल झाले. घरातील सोन्याचे दागिने, 80 हजारांची रोख रक्कम व मयत दातीर यांचे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार मयत दातीर यांच्या पत्नी सविता दातीर यांनी पोलिसांकडे केली.

या ना त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच : संजय राऊत

Back to top button