नगर : ‘त्या’ ठेकेदाराला सा. बां. कडून नोटीस….दणका पुढारीचा | पुढारी

नगर : ‘त्या’ ठेकेदाराला सा. बां. कडून नोटीस....दणका पुढारीचा

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील घाटघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे वास्तव विदारक चित्र दैनिक ‘पुढारी’ ने मांडले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या इमारतीच्या ठेकेदार सुनील बबन दातीर यास इमारतीचे कामात तत्काळ सुधारणा करीत काम पूर्ण करून आरोग्य विभागाच्या ताब्यात हस्तांतरित करण्याबाबत नोटीस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलेचे उपअभियंता डी, एस. बंड यांनी दिली आहे.

अकोले तालुक्यातील घाटघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत ठेकेदार आणि जि. प. सा. बां. विभागाच्या दुर्लक्षपणामुळे सुमारे 1 कोटी 68 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या कामाबाबत उद्घाटनापूर्वी तडे गेल्याने असल्याने डॉक्टर, सिस्टरांना आपल्या निवासस्थानी रुग्णांवर उपकेद्रात उपचार करावा लागत आहे,

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सन 2018 साली 1 कोटी 68 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सुसज्ज इमारत, वैद्यकीय अधिकारी रुम, परिचारिका रुम, प्रसूती गृह, ऑपरेशन रुम, औषधोपचार आदी सोई सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्या, तरी गेली 4 वर्षांपासून कासवगतीने काम सुरू आहे. या इमारतीचे काम बर्‍याच प्रमाणात अपूर्ण राहिलेले आहे. पण मात्र संबंधित ठेकेदाराने सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये काढले आहे. अकोले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल शेळके आरोग्य केंद्राच्या कामांना भेट देणार आहे.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

आरोग्य इमारतीची झाली दुरवस्था

घाटघर येथे प्राथमिक आरोग्य पथक इमारतीचे बांधकामाचा ठेका सुनील बबन दातीर या ठेकेदाराने घेतलेला आहे. सदर काम बर्‍याच दिवसांपासून रेंगाळत पडले आहे. आपणास अनेक वेळा वारंवार तोंडी व लेखी सूचना देवूनही उर्वरित किरकोळ कामे पूर्ण केलेली नाहीत. बर्‍याच ठिकाणी प्लास्तरला तडे गेले आहेत. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. मेनगेटजवळ दुरुस्ती करणे, गळती व इतर आवश्यक त्या सर्व बाबीही नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांचे आत दुरुस्ती करून व इतर कामे पूर्ण करावीत. सदर सर्व कामे पूर्ण करून व इमारत आरोग्य विभागाकडे त्वरित हस्तांतरीत करावी, अशी सक्त ताकीद दिली आहे.

Back to top button