नगर : खराब रस्त्यांमुळे गावाचा विकास खुंटला | पुढारी

नगर : खराब रस्त्यांमुळे गावाचा विकास खुंटला

बोटा : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले बदगी गावाची स्वातंत्र्यानंतर देखील नागरीकांना विकासाची व्याख्या अजूनही कळलीच नाही. याचे एकमेव कारण म्हणजे या गावाला चारही बाजूने जोडणारे रस्ते आहेत. या गावाला जोडणार्‍या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली असल्याने व दळणवळणासाठी धड रस्ता नसल्याने गावच्या विकासालाच खीळ बसली असल्याच्या चर्चांना आता पंचक्रोशीत उधाण येऊ लागले आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते

बदगी या गावाला जोडणारे रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, गाडी चालवताना रस्त्याची धूळ आणि दगड-गोटे मोठ्या प्रमाणावर उडताना दिसतात. सध्या तर पावसाळा सुरू झाला असल्याने रस्त्यावर मोठ मोठ्या तळ्यांची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत वाहनांची नुकसान होते. तर चालकांचे कंबरडे कामातून गेले आहे.
बदगी येथील नागरिकांना गावात जाताना अगदी खडतर प्रवास करावा लागत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

सर्वच रस्ते खाच खळग्यांचे

बदगी गावाला जोडणारे रस्ते बदगी ते बेलापूर, बदगी ते म्हसवंडी, बदगी ते खामुंडी, बदगी ते पिंपरी पेंढार, जुन्नर तालुक्याच्या हद्दीपर्यंत तसेच बदगी ते ब्राम्हणवाडापर्यंत या सर्व रस्त्यांची निंदनीय दुरावस्था झालेली दिसून येत आहे.
बदगीपासून तर खामुंडीकडे जाताना खिंडीपर्यतच्या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यात असणार्‍या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले असल्यामुळे या रस्त्याला जागोजागी तळ्यांचे स्वरूप आले आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तर खड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होण्याची शक्यता आहे.
रस्त्यांची कामे लवकर करावी, अशी मागणी धीरज शिंगोटे, कारभारी शिंगोटे, संपत औटी, सावकार शिंगोटे, दिलीप शिंगोटे, प्रभाकर शिंगोटे यांनी केली आहे.

या ना त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच : संजय राऊत

प्रशासनाने रस्त्याची कामे करावी

बदगी गावाच्या विकासासाठी सर्वच ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रयत्नशील आहे. गावाला जोडणार्‍या रस्त्याची दुरवस्था झालेली असताना दळणवळणाच्या सुविधांचा अभाव गावाला जाणवत आहे. प्रशासनाने बदगी गावाला जोडणारे रस्त्याची कामे करावी, अशी समस्थ ग्रामस्थांकडून मागणी करत आहे असे सरपंच प्रनेश शिंगोटेंनी सांगितले.

 मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर 

आमच्या गावातून गाडी वाहनाने कोणत्याही दिशेला जायचे म्हटले तर अंगावर काटा येतो. दळणवळणाची चांगली व्यवस्था नसल्याने गावच्या विकासाला गती मिळत नाही. तरी या रस्त्यांचे लवकरात लवकर काम करून बदगी गावाला विकासाच्या प्रवाहात आणावे हीच मागणी आहे.

                 – बाबाजी शिंगोटे, ग्रामस्थ.

Back to top button