नगर : एसटी महामंडळाकडे बसचा दुष्काळ | पुढारी

नगर : एसटी महामंडळाकडे बसचा दुष्काळ

नगर : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या नगर विभागाची बससेवा आता पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे दररोजचे उत्पन्न देखील सरासरी 60 लाख रुपये मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी 645 बस धावत होत्या. आजमितीस मात्र, दररोज 500 बस प्रवाशी घेऊन धावत आहेत. 88 बस वाहतूक क्षेत्राकडे वर्ग केल्या तर 40 ते 45 बस नादुरुस्त आहेत. एकंदरीत 125 बसचा सध्या तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ग्रामीण भागात बससेवा सुरु करणे अडचणीचे झाले आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गाने एन्ट्री केली. खबरदारी म्हणून सरकारने दोन अडीच महिने टाळेबंदी घोषित केली. त्यामुळे महामंडळाची बससेवा दोन ते अडीच महिने ठप्प होती. या काळात मोठा आर्थिक फटका बसला. या कालावधीत एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाने वाहतूक क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 88 प्रवाशी वाहतूक बसचे मालवाहतूक ट्रकमध्ये रुपांतर केले. काही बस जुन्या आणि जीर्ण झाल्या. काही अंतर पळाल्यानंतर नादुरुस्त होणार्‍या बस वाहतुकीपासून दूर केल्या. 2019 नंतर महामंडळाकडून नव्या बस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे नगर विभागाला जवळपास 125 बसचा तुटवडा जाणवत आहे.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

कोरोना संसर्ग व कामगारांचा संप यामुळे गेल्या दोन वर्षांत महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे कामगारांना पगार करण्यासाठी राज्य शासनाच्या दारी हेलपाटे मारण्याची वेळ महामंडळावर आली आहे. त्यामुळे नवीन बसची खरेदी करणे महामंडळाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली.

या ना त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच : संजय राऊत

बसची संख्या कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील जवळपास दीड हजार महसूल गावांपैकी 25 टक्के गावांत बससेवा सुरु करता आलेली नाही. काही ठिकाणी बससेवा सुरु केली. परंतु हवे तेवढे उत्पन्न उपलब्ध होत नसल्याची खंत महामंडळ नगर विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत सौम्य घट, २४ तासांत १७,०७० नवे रुग्ण, २३ मृत्यू

इतर प्रवाशांची तारांबळ उडणार

दोन वर्षे पंढरपूर यात्रा बंद होती.त्यामुळे जवळपास अडीच कोटींचा आर्थिक फटका बसला. नगर विभागाने यंदा 350 बसचे नियोजन केले. 5 जुलैपासून तारकपूर बसस्थानकातून बस सुटणार आहे. 8 दिवस यात्रेसाठी बस सोडण्यात येणार असल्यामुळे इतर मार्गावरील फेर्‍या कमी होणार त्यामुळे प्रवाशांची तारांबड उडणार आहे.

Back to top button