शेवगाव : दारुच्या नशेत पत्नीची हत्या करुण पतीची आत्महत्या | पुढारी

शेवगाव : दारुच्या नशेत पत्नीची हत्या करुण पतीची आत्महत्या

शेवगाव; पुढारी वृत्तसेवा : दारुच्या नशेत पत्नीची हत्या करुण पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खरडगाव येथे गुरुवारी रात्री घडली. याबाबत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून मयत वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील लताबाई दशरथ दळे (वय ४५) हिला दारुच्या नशेत लाकडी दांडक्याने ठार मारून पती दशरथ मन्सीराम दळे (वय ५०) याने आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १९) रात्री घडली.

याबाबत मुलगा नवनाथ याने दिलेल्या फिर्यादीत गुरुवार (दि.१९) रोजी रात्री ११च्या दरम्यान माझ्या आई वडिलांचे आपसात भांडण सुरु होते. त्यांचे नेहमीच वाद होत असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर शुक्रवार (दि.२०) रोजी सकाळी ६ वाजता माझा लहान भाऊ संदीप याने वडील दशरथ यांनी घराजवळ असलेल्या एका झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे पाहिले.

त्यावेळी आम्ही दोघे भाऊ आईला उठविण्यासाठी घरी गेलो असता आईची हालचाल होत नव्हती. तिच्या डोक्याला मार लागून डोक्यातून व नाकातून रक्त येत होते. जवळच रक्त लागलेला लाकडी दांडा पडलेला होता.

माझ्या वडिलांनी रात्रीच्या वेळी दारुच्या नशेत आईला दांडक्याने मारहाण करूण ठार मारले व पश्चातापात त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले.

पोलिसांनी मयत दशरथ दळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button