पुष्पवृष्टी, फुगड्या खेळत लुटला आनंद… सावता महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान | पुढारी

पुष्पवृष्टी, फुगड्या खेळत लुटला आनंद... सावता महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कसबा विभागातील संत शिरोमणी सावता महाराजांची दिंडीने मंगळवारी दिंडीचालक मोहन महाराज सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. संत सावता महाराज मंदिर येथून सकाळी 10 वाजता निघालेल्या पालखीचे पूजन शंकर महाराज मठाचे मठाधिपती महंत माधवबाबा यांच्या हस्ते करण्यात आले.

मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश

टाळ मृदंगाच्या गजरात शहरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. पालखीच्या स्वागतासाठी घरांसमोर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आतषबाजी, पुष्पवृष्टी करून व फुगड्या खेळत नागरिकांनी आनंद लुटला, तसेच पालखी सोहळ्यात लहान मुले, युवक, महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी होते. पालखीचे नेतृत्व मोहन महाराज सुडके अनेक वर्षांपासून करत आहेत.

एकनाथ शिंदे : शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आमच्याकडे, बहुमत चाचणीची चिंता नाही

दिंडीत कीर्तनकार मंडळी आहेत. दिंडी पालखीसोबत संत सावता महाराज मंदिर संस्थानतर्फे वारकरी मंडळींच्या आरोग्य सुविधेसाठी वैद्यकीय पथक असून, दिंडी पालखी सोहळ्यामध्ये रोज काकडा, भजन, कीर्तन, हरिपाठ, सामुदायिक जप आदी कार्यक्रम होणार आहेत. सिंधू तुपे, द्वारका बालवे, कडूबाई पालवे, लहानुबाई काळे आदी उपस्थित होते.

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, दिंडी संयोजक माजी नगरसेवक रमेश गोरे, सुरेखा गोरे, सुभाष बोरुडे, नगरसेवक महेश बोरुडे, अभिजित बोरुडे, राजेंद्र उदारे, उमेश तुपे, भोलेनाथ दुधाळ, देविदास शिंदे, शिवाजी साखरे, शिवाजी बालवे, नाथा कोकाटे, खंडुरंग सोनटक्के, गणेश सोनटक्के, राजू सोनटक्के, श्रीधर सोनटक्के, बबन गादे, छबुराव बालवे आदी उपस्थित होते.

Back to top button