पारनेर : नारायणगव्हाण येथे होणार चौपदरीकरण

पारनेर : नारायणगव्हाण येथे होणार चौपदरीकरण
Published on
Updated on

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथे रस्ता चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचा नव्याने सुधारित प्रस्ताव बनविण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्यालगतच्या मिळकतींचे उतारे जमा करण्याचे पत्र ग्रामसेवक, तलाठी यांना देण्यात आले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले.

या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेले आहे. त्यामुळे गावातील शाळकरी विद्यार्थी,अबालवृद्ध, गावकर्‍यांबरोबरच प्रवाशांनाही मोठा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्यामाठी ग्रामस्थ सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.

निवेदन, उपोषण, रास्ता रोको, टोलबंद आंदोलन अशा विविध मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम आंदोलनकर्ते, ग्रामस्थांकडून करण्यात आले. प्रशासनाने मागील आंदोलनाच्या वेळी अर्धवट रस्त्याचे काम गावांपर्यंत करत सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले. परंतु, उर्वरित रस्त्याचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.

त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पुन्हा नव्याने प्रशासनाकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसह अपूर्ण रस्त्यामुळे गावाची थांबलेली प्रगती याबाबत पाठपुरावा सुरु केला आहे. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने रस्त्यावरच्या सुरक्षिततेच्या कामांसोबतच नारायणगहाण चौपदरीकरणाच्या भूसंपादनाचा नव्याने सुधारीत प्रस्ताव बनविण्यास सुरुवात केली आहे. नारायणगव्हाण चौपदरकरणासह, महामार्गांवर सतत घडणारे अपघात रोखण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे, असे शरद पवळे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news