राहुरीच्या पूर्व भागात पावसाची हजेरी | पुढारी

राहुरीच्या पूर्व भागात पावसाची हजेरी

वळण : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. बहुतेक गावातून शेतात पाणी वाहिले. यामुळे लागवड होऊ तारा झालेली कपाशी, तसेच घास, ऊस आदी पिकांना हा पाऊस फायदेशीर झाला आहे, तर अनेक शेतकर्‍यांनी कपाशी लागवडीसाठी शेती तयार करून ठेवल्याने त्यांचाही लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रूक, पिंपरी वळण, चंडकापूर, माहेगाव, खुडरगाव, महाडूक सेंटर, मुसळवाडी, टाकळीमिया, मांजरी आदी परिसरातील वाड्या-वस्त्या बुधवारी काही ठिकाणी चारनंतर सुमारे दीड तास जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहे.

नाशिक : एकतर्फी प्रेमातून उंच डोंगरावरुन दरीत उडी घेत युवकाची आत्महत्या

वादळ वारा नाही, की ढगांचा गडगडाट नाही. अत्यंत शांततेत मोठ्या थेंबासह पाऊस झाल्याने काही क्षणातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाने सुस्कारा टाकला आहे.

खरिपाच्या पेरण्या होण्याचे चिन्ह आहे. उशिरा का होईना. पण पाऊस पडता झाल्याने सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला आहे. बुधवारी सायंकाळी सर्वदूर पाऊस झाल्याने काही अंशी शेतकर्‍यांमध्ये चिंतादूर होण्यास मदत झाली आहे.

Back to top button