घोडेगाव : अवैध दारूची विक्री बंद करण्याची मागणी | पुढारी

घोडेगाव : अवैध दारूची विक्री बंद करण्याची मागणी

नान्नज : पुढारी वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यातील घोडेगावमध्ये अवैद्य देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याने अनेक कुटुंबांचे संसार धुळीला मिळाले आहेत. दारू विक्रीमुळे महिलांची सुरक्षितता मोठी धोक्यात आल्याने महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर केला. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

सातारा : शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय भोसलेंना गुवाहाटीत पोलिसांनी घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, घोडेगाव येथे मोठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी दारूची विक्री सुरू आहे. याबाबत महिला व पुरुषांनी ग्रामपंचायतीकडे दारूबंदी विषयी अर्ज करून ग्रामसभेत दारूबंदी विषयी ठराव मंजूर केला. गावात सहा अवैध दारूची दुकाने असून, ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्य गेट शेजारी, राजवाडा समाज मंदिराशेजारी, अशी सहा अवैध दारूची दुकाने आहेत. परिणामी अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी केली आहे.

Back to top button