नेवासा : निबंधकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी | पुढारी

नेवासा : निबंधकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे हे आपल्या पदाचा दुरपयोग करून नेवासा येथे कामकाज करीत आहेत. ते काही प्रकरणात चुकीचे निर्णय देणे, कायद्याच्या पळवाटा शोधून मुदतवाढ देणे, अशा प्रकरणात मोठ्या रकमा घेत आहेत. नांगरे यांनी स्वत:च्या व नातेवाईकांच्या नावे मोठी संपत्ती कमावलेली असून, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सौंदाळा येथील सरपंच शरद आरगडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नगर : राजुरी शिवारातील खून प्रकरणी एक जेरबंद

आरगडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोकुळ नांगरे यांनी पदाचा दुरपयोग करुन गैरमार्गाने मोठी संपत्ती कमावलेली आहे. नांगरे यांच्याकडे आलेल्या तक्रार अर्जावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्याऐवजी तक्रार अर्जातील संबंधित दोषी व्यक्तींना पळवाटा शोधून देण्यास नांगरे हे मदत करत असल्याचे आरगडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

या कार्यालयात आलेल्या एखाद्या प्रकरणाचा निकाल शक्य होईल तेवढा लांबवायचा व नंतर तक्रारदाराला विश्वासात घेवून ‘तुम्ही माझ्या विरोधात एखादे आंदोलन करा…मग मला तुमच्या बाजूने निकाल देता येईल’, असा सल्लाही देतात. त्यांनी कमविलेल्या मोठ्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Back to top button