नगर : अखेर लालपरीची वळण गावात एंट्री ..! | पुढारी

नगर : अखेर लालपरीची वळण गावात एंट्री ..!

वळण : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागाला शहरास जोडणारी दळणवळणाच्या दृष्टीने विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी आवश्यक असलेली राहुरी-मांजरी बस अखेर सुरू झाल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर वळण ग्रामस्थांनी राहुरी- मांजरी बसचे चालक, वाहक व बसमधील प्रवाशांचा यथोचित सत्कार करून आनंदोत्सव साजरा केला.

नगर : शिक्षक बँक निवडणूक, 21 जागांसाठी 852 उमेदवारांचे देव पाण्यात

राहुरी तालुक्यातील पूर्व भागाला आवश्यक असलेली राहुरी-मांजरी बस कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद झाली होती. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नियमित प्रवासी, गोरगरीब वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. राहुरी बस आगाराने राहुरी-मांजरी बस पुन्हा सुरू केली. याबद्दल बस चालक नंदकुमार पालवे यांचा वळण सोसायटीचे सदस्य ऋषिकेश आढाव व वाहक रामभाऊ कोरडे यांचा ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके यांनी करण्यात आला.

नगर : जालंधरमधील पसार आरोपी शिर्डीत जेरबंद

वळणचे वाहक किरण गडाख यांचा सत्कार पत्रकार वसंत आढाव यांनी केला. या गाडीतील प्रवाशांना गुलाबपुष्प देण्यात आले. दरम्यान, यापुढे राहुरी येथून सकाळी 7.45 वा. दुपारी 12.30 वा. व 4.45 वाजता अशा तीन फेर्‍या दिवसभरातून होणार आहेत. बस बंद होऊ नये, यासाठी प्रवासी व विद्यार्थ्यांनी बसमधून प्रवास करावा, जेणेकरून एसटीला फेर्‍या करण्यास परवडेल, अशी अपेक्षा चालक-वाहकांनी व्यक्त केली. यावेळी अशोक काळे, अरुण खिलारी, रघुनाथ खुळे, मधुकर आढाव, विजय कोकाटे, अण्णा गोसावी, आदिनाथ काळे, संजय शेळके, प्रकाश मकासरे, प्रल्हाद कारले, संजय बनकर, गोरक्षनाथ गोसावी, दत्तू बाबा गोसावी, भीमराज आढाव, सुधीर आढाव, योगेश काळे, आदिनाथ गडाख, बाबासाहेब खुळे, बाळासाहेब काळे, दीपक जाधव, विद्यार्थी, प्रवासी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर मकासरे यांनी केले.

 

Back to top button