नेवासा : पतसंस्थेत साडेसतरा लाख रुपयांचा अपहार | पुढारी

नेवासा : पतसंस्थेत साडेसतरा लाख रुपयांचा अपहार

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा येथील नावाजलेल्या घुले पाटील पतसंस्थेमध्ये कर्मचार्‍यानेच साडेसतरा लाख रूपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात या कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी दत्ता लष्करे यास अटक केली असून, त्यास नेवासा न्यायालयाने 24 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या बाबत पतसंस्थेचे मॅनेजर अंकुश धनक यांनी नेवासा पोलिस ठाण्यात 20 जूनला दिलेल्या फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की, नेवासा येथील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमधील कर्मचारी दत्ता नरसू लष्करे हा गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थेचे दैनिक अल्प बचत खाते व कॅशियरचे कामकाज बघत आहे.

शिंदे यांच्या सफरीच्या अहवालाकडे दुर्लक्ष?

त्याने 1 मे 2021 ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या काळात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून दैनिक अल्पबचत ठेवीदारांचे 6 लाख 65 हजार 34 रूपये व 10 लाख 85 हजार 818 रूपये, असा 17 लाख 50 हजार 852 रूपयांचा अपहार केल्याचे मॅनेजर धनक यांनी तक्रारीत म्हटले आहे.

नेवासा पोलिसांनी दत्ता लष्करे विरूद्ध 420 सह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. लष्करे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यास 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक विजय करे हे पुढील तपास करीत आहेत. या अपहार प्रकरणात आरोपी दत्ता लष्करे याची आणखी कोणाशी मिलीभगत आहे का? याचा पोलिस शोध घेत आहेत.

Back to top button