पाथर्डी : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करा | पुढारी

पाथर्डी : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करा

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा :  विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेतील एसटी महामंडळाने बस फेर्‍या तत्काळ सुरू करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंदा आंधळे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत एसटी महामंडळाला निवेदन देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तत्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, जिरेवाडी, नांदूर निंबादैत्य, सोनोशी मुक्काम बस व पाथर्डी तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातील शाळेच्या वेळेतील बस सेवा येत्या 2 दिवसात तात्काळ सुरू करण्यात याव्यात. सध्या पावसाचे दिवस असून विद्यार्थ्यांची दिव्यांगाची वयोवृद्धांची गोरगरीब शेतकरी शेत मजुरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

नगर : श्रीरामपुरात मोबाईल चोरांचा धुमाकूळ

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी महामंडळाने बस सेवा द्यावी. नव तरुणी विद्यार्थिनी महिला यांना शाळेसाठी व अन्य कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागातील मोठ्या गावाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी कोणाला, तरी खासगी गाडीला हात करून मदत मागावी लागते.

अशा परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थिनी किंवा महिलेवर कोणतीही अभद्र वेळ येऊ नये, यासाठी महामंडळाने लक्ष घालावे. दि. 23 जूनपर्यंत शाळेच्या वेळेतील बस सेवा सुरू न केल्यास आगाराचे गेट बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे, उपाध्यक्ष शिवाजी बडे, रंजित आंधळे, गणेश सोलाट, पप्पू आव्हाड, नितीन बडे, राहुल शिरसाट, अजिनाथ आंधळे, सातपुते व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आगारप्रमुख महेश कासार यांनी एका मार्गावर बससेवा सुरू केली असून, अन्य मार्गांवर लवकरच बस सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाने दिली.

 

Back to top button