संगमनेर :दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे | पुढारी

संगमनेर :दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणार्‍या शाळा व शाळेच्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे डॉ. देवेंद्र ओहारा मतिमंद विद्यालय व संग्राम मूकबधिर विद्यालय व दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.

जिल्हा समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, उपायुक्त भगवान वीर, समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, दिनकर नाटे, रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब झावरे, संजय साळवे, चांगदेव खेमनर, नारायण डुकरे, मुख्याध्यापक वाय. डी. देशमुख आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांवर एक दिवशीय कार्यशाळेमध्ये चर्चासत्रामधून चर्चा झाली.
आ. डॉ. तांबे म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती विशेष व्यक्ती आहेत. या व्यक्तीसाठी सरकारने पुढाकार घेऊन विशेष उपक्रम राबवले आहेत. शाळा व शिक्षक यांच्या प्रश्नांबाबत मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करणार आहेे.

Back to top button