नगर : श्रीरामपुरात मोबाईल चोरांचा धुमाकूळ | पुढारी

नगर : श्रीरामपुरात मोबाईल चोरांचा धुमाकूळ

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  शहराच्या अनेक भागांमध्ये काल मोबाईल चोरी करणार्‍या टोळीने धुमाकूळ घालून अनेक लोकांचे मोबाईल चोरून नेले. यातून नगरपालिकेचे नगरसेवक देखील सुटले नाहीत.शहराच्या अनेक भागांमध्ये काल मोबाईल चोरी करणार्‍या टोळीने धुमाकूळ घालून अनेक लोकांचे मोबाईल चोरून नेले. यातून नगरपालिकेचे नगरसेवक देखील सुटले नाहीत.शहराच्या अनेक भागांमध्ये काल मोबाईल चोरी करणार्‍या टोळीने धुमाकूळ घालून अनेक लोकांचे मोबाईल चोरून नेले. यातून नगरपालिकेचे नगरसेवक देखील सुटले नाहीत. याबाबत परप्रांतीय महिलांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. काल या महिला शहराच्या अनेक भागात दिसून आल्या होत्या.

फातेमा कॉलनी सोसायटीचे चेअरमन नगरसेवक ताराचंद रणदिवे यांच्या घरातील तीन मोबाईल महिलांनी चोरून नेले, तसेच शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारच्या मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहे. याबाबत नागरिकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. घरामधील महिला घरात काम करीत असताना या परप्रांतीय महिला कंपाउंड आणि घराचे दार उघडून थेट घरात घुसतात आणि मोबाईल चोरून घेवून जातात.

Back to top button