केडगावातील सराईत गुन्हेगार हद्दपार | पुढारी

केडगावातील सराईत गुन्हेगार हद्दपार

नगर : पुढारी वृत्तसेवा:  केडगाव उपनगरात गुन्हे करून आपली दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगाराला नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आले. कार्तिक अशोक नरवडे (25, रा. मोहिनीनगर, केडगाव) असे हद्दपार केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.

खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे तीन गुन्हे दाखल असलेल्या नरवडे विरोधात हद्दपारीची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांनी सादर केला होता. प्रस्तावावर निर्णय घेत नरवडे याला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणार्‍यांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे.

Back to top button