नगर : जलसेतूसह कालव्यांच्या कामांना गती; मंत्री थोरातांचा पाठपुरावा | पुढारी

नगर : जलसेतूसह कालव्यांच्या कामांना गती; मंत्री थोरातांचा पाठपुरावा

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा :काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ध्यासपर्व मानून निळवंडे धरण पूर्ण केले आहे. कालव्यांच्या कामांचा दररोज ते पाठपुरावा करत असून अकोले तालुक्यातील जलसेतूसह डाव्या व उजव्या कालव्याची कामे सर्वत्र अत्यंत वेगाने सुरू आहेत.

निळवंडे धरण हे उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी व दुष्काळग्रस्तांसाठी वरदान ठरणारे आहे. जीवनाचे ध्येय मानून महसूल मंत्री थोरात यांनी अनंत अडचणींवर मात करून धरण पूर्ण केले. याच बरोबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर या धरणाच्या कालव्यांसाठी मोठा निधी मंजूर करून घेतला. 2019 पूर्वी ज्या ठिकाणी दोन जेसीबी कार्यरत होते. त्या ठिकाणी पस्तीस जेसीबींसह मोठी यंत्रणा कार्यान्वित झाली.

लॉरेन्स बिष्णोई गँगचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन

त्यामुळे कोरोना संकटातही रात्रंदिवस कालव्याची कामे अत्यंत वेगाने सुरू होती. जीवनाचे ध्येय असलेल्या निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्याची कामे लवकरात लवकर करून ऑक्टोबर 2022 मध्ये दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी मंत्री थोरात यांचा प्रयत्न आहे.
कालव्यांची कामे बहुतेक ठिकाणी पूर्ण झाली आहे. विविध ठिकाणच्या नदीवरील पूल, रस्त्यांवरील व ओढ्या नाल्यांवरील स्ट्रक्चरल कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत.

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील जलसेतू हा भव्य व मोठा असून या कामाची पाहणी मंत्री थोरात यांनी केली आहे. हे कामही अत्यंत वेगाने सुरू आहे. उजव्या व डाव्या दोन्ही बाजूंच्या कालव्यांच्या कामावर रात्रंदिवस यंत्रणा काम करत आहे. या कामांच्या गतीमुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.

नागरिकांत आनंदाचे वातावरण
मंत्री थोरात यांनी जलसेतूच्या कामाची पाहणी केली आहे. हे काम वेगाने सुरू आहे. उजव्या व डाव्या कालव्यांच्या कामावर रात्रंदिवस यंत्रणा काम करत आहे. कामांच्या गतीमुळे तळेगावसह दुष्काळी भागातील नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button