नगर : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप | पुढारी

नगर : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप

नगर : पुढारी वृत्तसेवा : अज्ञान मुलीवर बलात्कार प्रकरणी श्रीगोंदा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. भानुदास गंगाराम भिसे (रा.धारकरवाडी, चिंभळा शिवार), नामदेव अंबू अडागळे (रा.चिंभरा) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पिडीतेवर बळजबरीने बलात्कार करून कोणाला सांगितले, तर जिवे मारण्याची धमकी दिली होती.

Jalgaon Shivsena : शिवसेनेला आणखी मोठा धक्का; गुलाबराव पाटलांसह इतर काही नेते गुवाहाटीत दाखल

गर्भधारणा राहिल्याचा प्रकार पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आरोपींविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्याची सुनावणी श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या समोर झाली. या खटल्यात एकूण 8 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील पुष्पा कापसे – गायके यांनी कामकाज पाहिले.

Back to top button