नगर : आरटीओची ‘फेसलेस’ सुविधा..! एजंटगिरीला लगाम | पुढारी

नगर : आरटीओची ‘फेसलेस’ सुविधा..! एजंटगिरीला लगाम

नगर : पुढारी वृत्तसेवा : पत्ता बदलणे, नवीन लायसन काढणे यासह अन्य सहा फेसलेस सुविधा आता नागरिकांनी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. या सुविधेमुळे वाहनधारकांचे परिवहन कार्यालयातील हेलपाटे कमी होणार आहेत. मात्र अर्जदारांना मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक करण्यात आल्याने एजंटगिरीलाही लगाम बसणार आहे.

परिवहन खात्याने जून 2022 पासून सुरू केलेल्या ‘फेसलेस’ सुविधेमुळे परिवहन कार्यालयातील नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत. पूर्वी या सुविधा ऑनलाईन होत्याच. मात्र, एखाद्या कागदपत्राच्या व्हेरिफिकेशनसाठी त्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जाणे बंधनकारक होते. मात्र, यापुढे या सेवांसाठी आता आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

सत्ताबदलाच्या शंकेने मंत्री चिंताक्रांत तर फाईल क्लिअर करण्याच्या कामाला वेग

महत्त्वाचे म्हणजे फेसलेस सेवेमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन एजंटला पैसे देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे भविष्यात आरटीओ कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी होण्यात मदत होणार आहे. आरटीओच्या सेवांसाठी लागणार्‍या क्लिष्ट कागदपत्रांमुळे नागरिक एजंटचा पर्याय स्वीकारतात. मात्र आता फेसलेस सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या अँड्रॉईड मोबाईल किंवा संगणकाद्वारे आपली आरटीओमधली कामे करता येणार आहेत.

ई-केवायसी बंधनकारक
फेसलेस सुविधेचा लाभ घेण्याकरिता आधारकार्ड व त्या आधारकार्डमधील अचूक मोबाईल नंबर अर्थात ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. सेवांचा लाभ घेण्याकरिता आधारक्रमांकाचा वापर करण्यात येणार असून आधार क्रमांकामधील मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येणार आहे.

अर्जदाराचा वेळ वाचणार
अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यानंतर वाहनधारकास कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. नवीन लायसन्स नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. त्यातून अर्जदाराची वेळेची बचत होणार त्याचबरोबर कागदपत्रांची प्रत काढण्याची आवश्यकता नसल्यामुळे पेपरची सुध्दा बचत होणार आहे.

 

Back to top button