नगर : राहुरीत तीन सावकारांविरोधात गुन्हा | पुढारी

नगर : राहुरीत तीन सावकारांविरोधात गुन्हा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : 20 टक्के दराने घेतलेल्या 2 लाखाचे कर्ज फेडण्यासाठी शेतकर्‍यावर दोघांकडून तब्बल 30 टक्के दराचे कर्ज घेण्याचा बिकट प्रसंग ओढावला. व्याजाची रक्कम व मुद्दल फेडणे शक्य नसल्याने सावकाराने शेतकर्‍याकडून व्याज वसुलीसाठी ट्रॅक्टर ओढून नेत जीव घेण्याची धमकी दिली. हा प्रकार राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडला. दरम्यान, याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने देवळाली- प्रवरा हद्दीत खळबळ उडाली आहे.

शक्ती कपूरचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, बंगळूर पाेलिसांची कारवाई

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र एकनाथ नालकर (रा. राहुरी) या शेतकर्‍याने फेब्रुवारी 2020 मध्ये सचिन मधूकर मोरे (रा. देवळाली प्रवरा) कडून 20 टक्के व्याजाने 2 लाख रक्कम घेतली होती. याबदल्यात नालकर यांच्याकडून कोरा स्टॅम्प, ट्रॅक्टरचे आरसी बूक व दोन धनादेश घेत कर्ज दिले. 2 लाखाचे दरमहा 40 हजार रूपये व्याज नालकर हे मोरे यांना देत होते. दरम्यान, शेतीत तोटा झाल्याने व्याज थकले. ही रक्कम देण्यास नालकर यांनी सचिन बजरंग जाधव (रा. देवळाली- प्रवरा) कडून 20 टक्के व्याजदराने 1 लाख रूपये घेवून ते मोरे यास दिले.

Amit Shah : त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठात अमित शाह करणार योग दिवस साजरा

रे व जाधव यांना 60 हजार रूपये व्याज दरमहा नालकर देत होते. नालकर अडचणीत असल्याने नवनाथ लहानू काकडे (रा. देवळाली- प्रवरा) यांनी नालकर यांना 10 टक्के दराने दीड लाख कर्ज दिले, मात्र थकीत पैशासाठी काकडे यांनी नालकर यांचा ट्रॅक्टर नेला. कर्ज वसुलीसाठी धमकी दिली. याबाबत नालकर यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली. सुनिल ऊर्फ सचिन मोरे, सचिन जाधव व नवनाथ काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. प्रताप दराडे व स.पो. नि. मधुकर शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button