सावेडीतून 41 तोळे लंपास, भिस्तबाग परिसरात जबरी घरफोडी | पुढारी

सावेडीतून 41 तोळे लंपास, भिस्तबाग परिसरात जबरी घरफोडी

नगर : पुढारी वृत्तसेवा: सावेडीच्या भिस्तबाग चौकातील साईरामनगरमधील सुदर्शन हाऊसिंग सोसायटीतून 41 तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनिवार (दि.11) जून रोजी पहाटे ही चोरी झाली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत अरविंद गर्गे (रा.साईरामनगर, भिस्तबागचौक) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.गर्गे यांच्या घरी नामकरणाचा कार्यक्रम असल्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गर्गे कुटुंब जागे होते. नेहमीप्रमाणे कामवाली बाई गर्गे यांच्या घरी शनिवारी पहाटेच आली. तिला किचनचा दरवाजा बाहेरून लावला असल्याचे दिसले.

तसेच किचनमधील तीन-चार बॅग घराच्या कम्पाउंडमध्ये पडलेल्या दिसल्या. त्यानंतर गर्गे यांनी घराची पाहणी केली असता किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरफोडीत 13 लाख 42 हजार किमतीचे 41 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत.

Back to top button