सिद्धटेक : वादळाने सौर कृषिपंपाचे नुकसान | पुढारी

सिद्धटेक : वादळाने सौर कृषिपंपाचे नुकसान

सिद्धटेक : मान्सूनपूर्व वादळी वार्‍यामुळे बारडगाव सुद्रिक (ता. कर्जत ) येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठे वृक्ष कोसळल्याने सिद्धटेक-राशीन राज्यमार्ग काही काळ बंद होता, तसेच वीज वाहक खांब कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. परंतु महावितरणच्या कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून तो पूर्ववत केला.

या वादळी वार्‍यामुळे बारडगाव येथील शेतकरी अंबादास बबन गावडे यांच्या सर्वे नंबर सतरामधील मुंख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत तीन अश्वशक्तीचा सौरपंप बसविण्यात आला होता. परंतु या वादळामुळे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा सौर पॅनल, बॅटरी, आधाराचा सांगाडा जोरदार वार्‍यामुळे त्याचे तुकडे पडले आहेत. त्यामुळे हा सौरपंप बंद पडला आहे. शासन नियमानुसार पाच वर्षे देखभाल – दुरुस्ती करण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडे आहे. त्यांनी तातडीने याची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

Back to top button