राहात्यात तरुणाचा निर्घृण खून, 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

राहात्यात तरुणाचा निर्घृण खून, 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

राहाता : पुढारी वृत्तसेवा

मागील भांडणाच्या कारणावरून राहाता शहरात तरुणाचा निर्घृण खून झाल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील आंबेडकर नगरमधील शासकीय घरकुलाच्या इमारतीत बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. योगेश किसन वाघमारे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमी अवस्थेत योगेश यास शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

Harini Logan : भारतीय वंशाच्या हरिणी लोगननं इतिहास रचला, ठरली स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेची विजेती

योगेशच्या छातीसह अंगावर धारदार शस्राचे गंभीर वार करण्यात आले आहेत. भूषण संजू निकाळे, योगेश संजू निकाळे, संजय दादू निकाळे, रतनबाई दशरथ कटारनवरे, मनीषा वाघमारे, अमित चंद्रकांत वाघमारे, संगिता संजय निकाळे, उत्कर्ष ऊर्फ भैय्या सोमनाथ लुटे, सोमनाथ लुटे, विशाल मोकळ, महेश सोमनाथ पाळंदे, गौतम सोमनाथ पाळंदे, अमोल सोमनाथ पाळंदे (सर्व रा. राहाता) यांच्या विरोधात पोलिसांनी खुनासह आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : विवाहासाठी वर्‍हाडासोबत आलेली तरुणी झाली बेपत्ता, सर्वत्र खळबळ

गुरुवारी सकाळी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव तसेच राहाता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे व पोलिस पथकाने भेट देऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवत यातील पाच आरोपींना रात्री उशिरा अटक केली. गुरुवारी दुपारपर्यंत राहाता शहर बंद ठेवण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून राहाता शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहे.

संतप्त नातेवाइकांकडून रास्ता रोको..!

दरम्यान, माझ्या मुलाच्या मारेकर्‍यांना कडक शासन करावे, अशी मागणी योगेशच्या वडिलांसह नातेवाइकांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी रवींद्र कटारनवरे यास जोपर्यंत अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत मृताच्या नातेवाइकांनी राहाता शहरात रास्ता रोको केला. पोलिस ठाण्यासमोरच धरणे धरत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

कोल्हापूर : ‘एफआरपी’त होणार 150 रु. वाढ

Back to top button