अमेरिकेची कन्या झाली बहिरोबावाडीची सून | पुढारी

अमेरिकेची कन्या झाली बहिरोबावाडीची सून

पारनेर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बहिरोबावाडी येथील देठे परिवारात अनोखा विवाह सोहळा पार पडला. मन जुळली, तर ते सातासमुद्रापार जाऊन संसार थाटू शकतो. याचाच प्रत्यय तालुक्यात पहावयास मिळाला. बहिरोबावाडीच्या नवरदेवाने थेट अमेरिकेतील मुलीला लग्नाची मागणी घातली. विकास देठे असं या नवदेवाचे नाव, तर स्टेफनी हक असं नवरी मुलीचे नाव आहे.

युपीएससी परीक्षेत राज्‍यात प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम 

बहिरोबावाडीतील माजी सैनिक अर्जुन देठे यांचा मुलगा विकास हा नोकरीनिमित्त अमेरिकेतील ट्रेडेन्स या कंपनीत उत्पादन व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. या दरम्यान विकास व स्टेफनी यांचा परिचय होऊन मैत्रीत रूपांतर झाले. पुढे दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले. स्टेफनी या जेम्स हक यांच्या द्वितीय कन्या असून, त्यांनी देखील डेन्व्हर विद्यापीठातून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स व बोस्टन विद्यापीठातून मास्टर्स इन थिएटर या पदव्या प्राप्त केल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीत ताकद दाखवून देवू : नाना पटोले

सध्या स्टेफनी या ऍमेझॉन या कंपनीत उत्पादन विपणन व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. अमेरिका व भारत या देशांची संस्कृती, धर्म, भाषा भिन्न असताना देखील या दोघांच्याही कुटुंबाने या विवाहासाठी कुठल्याही प्रकारचा विरोध न करता संमती देत एक आदर्श समाजापुढे ठेवला. यापूर्वी गोरेगाव, भनगडेवाडी येथे परदेशी मुली सुना म्हणून आलेल्या असताना आता बहिरोबावाडी त देखील देठे परिवाराने अमेरिकेची मुलगती सून म्हणून स्वीकारली आहे. हा विवाहसोहळा नुकताच नगर येथे झाला

Back to top button