सारसनगर येथील गुन्हेगारांची टोळी नगर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार | पुढारी

सारसनगर येथील गुन्हेगारांची टोळी नगर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार

नगर : पुढारी वृत्तसेवा

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील सारसनगर येथील गुन्हेगारांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी २ वर्षांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. अविनाश विश्वास जायभाय (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव), ऋषीकेश अशोक बडे व नितीन उर्फ किरण किसन लाड (दोघे रा. भगवान बाबा नगर, सारसनगर) असे या गुन्हेगारांची नावे आहेत.

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नसून स्वाभिमान! संभाजीराजेंचा मोठा निर्णय

अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलल्या या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी हद्दपार प्राधीकरण तथा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. त्याबाबतचे आदेश भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने वरील तिन्ही इसमांना संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.

Cruise drug bust case | कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीनचिट

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पो.हे.कॉ.कैलास सोनार, अजय नगरे ,पो.ना. भानूदास खेडकर , पो. ना. राहुल द्वारके यांनी केली आहे.

हेही वाचा

corona : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ३ टक्क्यांनी वाढ

हॉकी संघाचा ट्रीपल धमाका

आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन ‘रॉयल’ आज भिडणार

Back to top button