जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चोपडा शहरातील यावल रोडवर अवैधपणे गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या इसमाला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील यावल रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये संशयित आरोपी सुनील अमरसिंग बारेला (वय-२८ रा. गौऱ्यापाडा पाडा, ता. चोपडा) हा विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस घेऊन फिरत असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंगळवारी (दि.११) रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी सुनील बारेला यास अटक केली. त्याच्याकडून २७ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस, तसेच १५ हजारांची रोकड आणि दुचाकी असा एकूण १ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मांडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहेत.
हेही वाचा: