महाराष्ट्र
भयंकर..!आईस्क्रीम कोनमध्ये सापडले मानवाचे बोट, महिलेची पोलिसात धाव
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील मालाड परिसरात एक भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये चक्क मानवी बोट सापडले. यानंतर महिलेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
मालाड परिसरातील एका महिलने आईस्क्रीमची ऑनलाईन ऑडर दिली होती. महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. यानंतर महिलेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली.. मालाड पोलिसांनी संबंधित आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करुन आईस्क्रीम तपासासाठी पाठवले आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेले मानवी अवयव पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवले असल्याचे मालाड पोलिसांनी सांगितले.