पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कडून गेल्या वर्षी पुणे येथे ISIS प्रकरणी छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य, शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात चार जणांना आरोपींची नावे जोडण्यात आली आहेत. त्यांच्यासह आणखी एकावर या प्रकरणी आरोप जोडून पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती NIA ने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून दिली आहे. (NIA Action)
यापूर्वी जुलै 2023 मध्ये NIA ने पुण्यात छापेमारी करत, ISIS शी संबंधित साहित्य, शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि रसायने जप्त करण्यात आले होते. दरम्यान पुणे ISIS छापेमारी प्रकरणी आत्ता पर्यंत ११ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे, असे देखील राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) म्हटले आहे. (NIA Action)
यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ISIS प्रकरणी भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादविरोधी छापे टाकले. दरम्यान इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी गटातील ८ संशयित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत एएनआयएने संशयितांना अटक केलेल्या ठिकाणाहून सल्फर, पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, गनपावडर, साखर आणि इथेनॉल, धारदार शस्त्रे, बेहिशेबी रोकड आणि गुन्ह्याची कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांसह स्फोटकं, कच्चा माल जप्त केल्याचे एनआयएने सांगितले होते.
एनआयएच्या (NIA) पथकांनी केलेल्या कारवाईत कर्नाटकातील बल्लारी आणि बेंगळुरमध्ये पसरलेल्या १९ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात अमरावती, मुंबई आणि पुणे तर झारखंडमधील जमशेदपूर आणि बोकारो आणि नवी दिल्लीत छापेमारी केल्याचे म्हटले आहे. छाप्यांदरम्यान अटक करण्यात आलेले आठ ISIS एजंट हे प्रतिबंधित संघटना ISIS च्या दहशतवाद आणि दहशताशी संबंधित कृत्ये आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात काम करत असल्याचेही एनआयएने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले होते. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.