थंडी वाढण्याचे संकेत | पुढारी

थंडी वाढण्याचे संकेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात राज्यात बहुतांश भागात पाऊस झाला. मात्र, २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील वातावरण कोरडे राहील. त्यामुळे किमान तापमानात लवकरच घट होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

एसटी कर्मचार्‍यांचा संप चर्चेतूनच सुटू शकतो : शरद पवार

यंदा ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबरमध्येही अवकाळी पाऊस बरसल्याने थंडी पडलीच नाही. ढगाळ वातावरण कायम राहिल्याने स्वेटर कपाटाबाहेर निघालेच नाहीत. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे यंदा राज्यात पाऊस सुरू आहे. मात्र, २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

जुन्नर : अनंत नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा, व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या

राज्याचे सरासरी किमान तापमान २१ ते २२ अंशांवर गेले आहे. त्यामुळे पहाटेची वेळ सोडली, तर दिवसा आणि रात्रीही उकाडा जाणवत आहे. २५ पासून राज्यातील ढगाळ वातावरण नाहीसे होणार असल्याने किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच कडाक्याची थंडी सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा

‘विराट कोहली-राहुल द्रविड जोडी जमणार कारण द्रविड…’

parambir singh : फरार घोषित झालेले परमबीर सिंग म्हणतात, मी ‘या’ ठिकाणी आहे !

farmer leader rakesh tikait : राकेश टिकैत यांची अन्य मागण्यांसाठी सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत

खासगी शाळांच्या शुल्ककपातीचा निर्णय कागदावरच!

‘पाहुणे’ आले; पण उशीरा

Back to top button