पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक आणि नागपूर जिह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. आजही (दि.२१) महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने लाखो परीक्षार्थी खोळंबले. (Talathi Exam)
राज्यातील परीक्षेमध्ये होणारे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे, पेपरफुटी प्रकरणामुळे तलाठी परीक्षा जिल्हा प्रशासकीय पातळीवरून संबंधित प्रक्रिया थेट जमाबंदी आयुक्तांच्या समन्वयाने घेण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार चार हजार 466 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, राज्यभरातून तब्बल 11 लाख अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 10 लाख 30 हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले असून, एकाचवेळी परीक्षा घेण्याचे नियोजन, परीक्षा केंद्र आणि आसन व्यवस्था, सुरक्षितता आणि इतर नियोजनाबाबत पूर्ण तयारी करत 17 सप्टेंबरपासून परीक्षेला सुरुवात करण्यात आली आहे.
आज महाराष्ट्रात अमरावती, नागपुर, लातुर, अकोला आदी तलाठी परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने परिक्षा केंद्रावर गोंधळ सुरु झाला आणि विद्यार्थी संभ्रमात पडले. सर्व्हर डाऊन झाल्यावे विद्यार्थ्यांमध्ये मनस्तपा व्यक्त केला जात आहे. धुळ्यात परिक्षा दिडसातानंतर सुरु झाली. सकाळी 9 ते 11 ही परीक्षेचे वेळ होती. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी खोळंबली. त्यामुळे अद्यापही परीक्षा केंद्राबाहेरच होते.
हेही वाचा