Mumbai : कोरियन पर्यटक महिलेची छेडछाड, व्हिडिओ व्हायरल, दोघांना अटक | पुढारी

Mumbai : कोरियन पर्यटक महिलेची छेडछाड, व्हिडिओ व्हायरल, दोघांना अटक

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबईत एका दक्षिण कोरियन पर्यटक महिलेची छेड काढल्या प्रकरणी दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील खार भागात हा प्रसंग बुधवारी रात्री आठ वाजता घडला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तब्बल एक हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

या व्हिडिओत एक कोरियन मुलगी यु ट्यूबवर लाइव्ह स्ट्रिमिंग करत होती. या दरम्यान एक मुलगा तिच्या एकदम जवळ आला. तो तिचा हात धरून ओढत नेत होता. तीने त्याला विरोध केल्या ती त्याला नको-नको म्हणत होती. शेवटी ती हात सोडवून ती तिथून निघून जात होती. त्यावेळी दोन मुले दुचाकीवरून येऊन तिला जबरदस्तीने लिफ्ट ऑफर करत होते. ती तिच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्यांना नकार देत होती. ती म्हणाली की मला जवळच जायचे आहे. मला लिफ्ट नको आहे.

या मुलीने नंतर हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आणि म्हणाली, आरोपींनी पुन्हा दुस-या कोणत्या महिलेसह असे करू नये म्हणून तिने हा व्हिडिओ शेअर केला. तिने ट्विटरवर म्हटले आहे,

”काल रात्री स्ट्रिमिंग करताना, एका मुलाने मला त्रास दिला. तो त्याच्या मित्रासोबत असल्यामुळे परिस्थिती आणखी वाढू नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले. तर काही लोकांचे म्हणमे होते की मी खूप मैत्रीपूर्ण आणि संभाषणात गुंतल्यामुळे याची सुरुवात केली होती. ही घटना स्ट्रीमिंगबद्दल मला पुन्हा विचार करायला लावते.”

या ट्विटसह या महिलेने तिच्या ट्विटर हँण्डलवर व्हिडिओ पोस्ट करताच हा व्हिडिओ व्हायरल झाला. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यावर अनेकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवळपास 4,800 लोकांनी आतापर्यंत रिट्विट केले आहे. तसेच 759 Quote Tweets यावर सुप्रिया सुळे यांनीही कमेंट केली आहे.

अशा अतिउत्साही लोकांमुळे देशाची प्रतिमा मलिन, कठोर कारवाईची मागणी – सुप्रिया सुळे

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला रिट्विट करीत सुप्रिया सुळे यांनी घटनेला संतापजनक म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत अशा तरुणांवर कठोर कारवाई करण्याबाबत विचार करावा असे लिहिले आहे. वाचा सुप्रिया सुळे यांचे ट्विट,

”खार,मुंबई येथे दोन तरुणांनी कोरियन महिलेची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे ही महिला ‘लाईव्ह स्ट्रिमींग’ करीत असताना हे घडले.भारताची पाहुणी असणाऱ्या या महिलेसोबतची ही घटना अतिशय संतापजनक व दुःखद आहे.

या अशा अतिउत्साही लोकांमुळे देशाची प्रतिमा मलिन होते. प्रत्येकाची सुरक्षा व त्यांना सुरक्षित वातावरण देणे ही सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, हा प्रकार अतिशय गंभीर असून पर्यटकांना त्रास देणाऱ्यांना चाप बसेल अशी कारवाई करणे आवश्यक आहे.

यासाठी या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याबाबत सकारात्मक विचार करावा. @mieknathshinde @Devendra_Office @Dev_Fadnavis”

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेत मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरून माहिती दिली आहे.

पोलिसांनी त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, खार पोलीस ठाणे हद्दीत एका कोरियन महिलेसोबत घडलेल्या घटनेची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून सुमोटो तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Gujarat Assembly Election 2022 : फॅमिली असावी तर अशी! कुटुंबातील ६० जणांनी एकाचवेळी केलं मतदान

Samantha Ruth Prabhu : सामंथा उपचारासाठी दक्षिण कोरियाला रवाना

Back to top button