पुणे : भोर पंचायत समिती सभापतींसह दोन सदस्याचे पद रद्द | पुढारी

पुणे : भोर पंचायत समिती सभापतींसह दोन सदस्याचे पद रद्द

सारोळा (पुणे), पुढारी वृत्तसेवा : भोर पंचायत समिती च्या सभापती दमयंती पर्वती जाधव, सदस्य श्रीधर रघुनाथ किंद्रे व मंगल सोपान बोडके या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी रद्द केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणूकीमध्ये सभापतीपदची उमेदवारी लहूनाना शेलार यांना दिली होती,त्यावेळी वरील सदस्यांनी बंडखाेरी करून सभापतीपदी दमयंती जाधव यांची वर्णी लावली होती ,त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर आणि विद्यमान उपसभापती लहूनाना शेलार यांनी १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती,त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३(१)(बी) मधील तरतुदीनुसार वरील निर्णय दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सभापतींसह अन्य दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मंगळवारी (दि. १४ )या बाबत आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकारांना दिली. भोर पंचायत समितीचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती लहूनाना शेलार हेच पाहतील असे ही त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादीने ही कणखर भूमिका घेत यापूर्वी दोन सदस्यांना पक्षातून निलंबित केले होते.

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हाध्यक्ष व मी रीतसर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. शहानिशा करून जिल्हाधिकारी यांनी योग्य न्याय दिल्याचे समाधान आहे. पक्षाशी प्रामाणिक राहील्यावर निश्चित न्याय मिळतो.

-लहुनाना शेलार (उपसभापती पंचायत समिती, भोर)

Back to top button