बलात्कार पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर आरोपीला जामीन – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश – Rapist Ordered to marry victim for bail | पुढारी

बलात्कार पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर आरोपीला जामीन - मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - Rapist Ordered to marry victim for bail

बलात्कार पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर आरोपीला जामीन

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : बलात्काराचा आरोप असलेल्या २६ वर्षांच्या युवकाला पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. या प्रकरणात पीडित महिला बेपत्ता आहे. त्यामुळे पीडिता एक वर्षात सापडली तर लग्न करावे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. Rapist Ordered to marry victim for bail

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी १२ ऑक्टोबरला हा आदेश दिला आहे.

या प्रकरणातील पीडिता २२ वर्षांची आहे. पीडिता आणि युवक यांच्यांत प्रेमसंबंध होते आणि ते परस्परांच्या सहमतीने संबंधात होते. त्यातून ही पीडिता गरोदर राहिली. ही महिला गरोदर राहिल्यानंतर या युवकाने तिला टाळायला सुरू केले. त्यामुळे फेब्रुवारी २०२०ला पीडितेने तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांना या युवकाला अटक केली.

ही महिला आणि युवक २०१८पासून नातेसंबंधात होते. आपल्या संबंधाची कल्पना घरच्यांना होती, असे पीडितेने तक्रारीत नमुद केले आहे.
ही महिला २०१९ला गरोदर राहिली. हा प्रकार घरी कळू नये, म्हणून या महिलने घर सोडून दिले. जानेवारी २०२०मध्ये एका रुग्णालयात तिने मुलाला जन्म दिला. बाळाला या महिलेने एका इमारतीच्या खाली टाकून दिले होते. या प्रकरणात या महिलेवर स्वतंत्र गुन्हा नोंद झाला आहे. या बाळाला नंतर अनाथ आश्रमात दाखल करण्यात आले. एका कुटुंबाने या बाळाला दत्तक घेतले आहे.

न्यायमूर्ती डांगरे म्हणाले, “महिलेवर गुन्हा नोंद असल्याने ती बेपत्ता असेल, असे दिसते. आरोपीने या प्रकरणात पीडितेशी लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणातील पीडिता ही सज्ञानी आहे. तसेच संबंध परस्पर सहमतीने होते, ते तिने मान्य केले आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देता येईल. पण या युवकाने संबंधीत पीडितेशी एका वर्षात लग्न करणे बंधनकारक असेल. जर पीडिता सापडली नाही तर ही अट लागू असणार नाही.”

हेही वाचा

Back to top button