
पुढारी ऑनलाइन डेस्क : विनायक मेटे यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना असून ही एक मोठी क्षति आहे. मराठा समाजाची कधीही न भरून निघणारी हानी आहे. ते सामांन्यासाठी लढणारे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने आज सामान्यांसाठी लढणारा नेता हरपला आहे. ही राजकारणात कधीही भरून न निघणारी हानी आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
विनायक मेटे यांचे आज सकाळी सहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचे निधन झाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तसेच मी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आहे. असेही ते म्हणाले.