पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या देशात बेसणाचे लाडू (Indian Food) खूपच प्रसिद्ध आहेत. विशेष करून सणासुदीला हे बेसणाचे लाडू तयार केले जातात. बेसणाचे लाडू तयार करण्याची पद्धत खूपच सोपी आहे.
सध्या श्रावण महिना सुरू आहे, त्यात गोडधोड आपल्या ताटात असतंच की… त्यामुळे बेसणाचा लाडू आपल्या जीभेवर पाणी आणणारा पदार्थ आहे. चला बेसणाचे लाडू तयार करण्याची सोपी पद्धत पाहू या…
बेसणाच्या लाडूसाठीचे साहित्य
१) दोन वाटी बेसण
२) पाऊण कप तूप
३) चार कप पिठी साखर
४) अर्धा चमचा वेलची पावडर
५) तीन-चार चमचे दूध
६) आवडीनुसार ड्रायफूड्स
टीप : तुम्ही मधुमेहाचे (डायबेटीज) पेशंट असाल आणि साखर तुम्हाला वर्ज्य असेल, तर साखरेऐवजी खारकाची (सुखलेले खजूर) पावडरदेखील आपण वापरू शकता.
बेसणाचा लाडू करण्याची कृती
१) बेसणचा लाडू तयार करण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये तूप आणि बेसण मिक्स करा.
२) ३० ते ४० मिनिटं खरपूस रंग येईपर्यंत बेसण (Indian Food) चांगला भाजून घ्या. त्यानंतर थोडासा सुंगध येऊ लागले. गरम असतानाच दूध टाकले की, लाडू छान होतात.
३) त्यानंतर भाजलेलं बेसण एका परातीत काढून घ्या आणि त्याला किमान २ तास तरी थंड होऊ द्या.
४) त्यात ड्रायफूड्स (बदाम, काजू, पिस्ता…) घाला.
४) त्यानंतर पिठीसाखर आणि वेलदोड्याची पावडर मिक्स करा.
५) बेसणात टाकलेले सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले की, लाडूचे पीठ थोडे पातळ झाल्यानंतर लाडू वळावेत.
पहा व्हिडीओ : बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी…
या रेसिपी वाचल्यात का?