जिल्ह्यात दिसू लागला नेत्रसुखद दुर्मिळ कुमुदिनीचा बहर …! | पुढारी

जिल्ह्यात दिसू लागला नेत्रसुखद दुर्मिळ कुमुदिनीचा बहर ...!

नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात प्रथमच दोन दुर्मिळ प्रजातींच्या कुमुदिनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी फुलविण्यात निसर्गप्रेमींना यश आले आहे. राहुरी तालुक्यातील धामोरी येथील निसर्गप्रेमी प्रतिम ढगे यांनी आपल्या शेतात जगातील सर्वात मोठी मानली जाणारी ‘कुमुदिनी’ व्हिक्टोरिया अ‍ॅमॅझॉनिका अर्थात राजकमळ फुलविण्यात यश मिळविले.

तर, जगातील अतिशय दुर्मिळ मानली जाणारी ससिमॉन्थॉन नावाची कुमुदिनी भिंगार येथील जागतिक कुमुदिनी संशोधक शिक्षक जयराम सातपुते यांनी आपल्या गच्चीवरील कमळबागेत फुलविली आहे. ही कुमुदिनी फुलविण्यासाठी त्यांना भिंगार येथील जागतिक कुमुदिनी संशोधक शिक्षक जयराम सातपुते व आळंदी येथील कमळसंवर्धक सतीश गदिया यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रयागराजमध्ये भयावह चित्र, गंगेच्या तीरावर मृतदेहांचे दफन सुरूच

झाडांची आवड असलेल्या प्रतिम ढगे यांनी आपल्या घरी विविध मसाल्यांची, शोभेची व अत्यंत दुर्मिळ अशा झाडांची लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे अडेनिअम वनस्पतीच्या सुमारे 300 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. आता त्यात अ‍ॅमेझॉनिकाचाही समावेश झाला आहे. व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका कुमुदिनीचा शोध 1801 मध्ये बोलिव्हियामध्ये अमेझॉन नदीच्या खोर्‍यातील उथळ पाण्यात लागला.

ही कुमुदिनी त्याच्या प्रचंड गोलाकार पानांसाठी प्रसिद्ध आहे. याची काटेदार पाने 10 फूट व्यासापर्यंत वाढतात. त्यामुळे तिला वाढविण्यासाठी छोटा तलाव बनवावा लागतो.पानांवरील काटे वनस्पतीला शाकाहारी माशांपासून वाचवितात. या अ‍ॅमॅझॉनिका कुमुदिनीबरोबरच जगातील अतिशय दुर्मिळ मानली जाणारी ससिमॉन्थॉन नावाची कुमुदिनी भिंगार येथील जागतिक कुमुदिनी संशोधक शिक्षक जयराम सातपुते यांनी स्वत: आपल्या गच्चीवरील कमळबागेत फुलविली आहे.

Sherin Selin Mathew : ट्रान्सवुमन मॉडेलची गळफास घेत आत्महत्या

सातपुते यांच्या गच्चीवरील जलीय वनस्पतींच्या बागेत सुमारे 250 पेक्षा जास्त वैविध्यपूर्ण प्रजातींचे कमळ-कुमुदिनी असून, सहस्त्रदल कमळाबरोबरच अतिशय दुर्मिळ वनस्पतींचे संकलन आहे. त्यात पिवळ्या धम्मक ससिमॉन्थॉन कुमुदिनीच्या फुलण्याने सुवर्ण झळाळी मिळाली आहे. ससिमॉन्थॉन या कुमुदिनीचे संशोधक थायलंड देशातील अरूण कॉब्काऊ हे असून, ही कुमुदिनी भारतात आजपर्यंत अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडेच फुलली आहे.

या दोन्ही कुमुदिनी जगात अतिशय दुर्मिळ प्रजातींच्या व अत्यंत आकर्षक मानल्या जात असून, भारताच्या व नगर जिल्ह्याच्या जैवविविधतेत भर घालणार्‍या ठरल्या आहेत. त्यामुळे प्रतिम ढगे व जयराम सातपुते या दोघांचे निसर्गप्रेमी वर्तुळातून कौतुक होत आहे.

बुलडोझर कारवाईसंबंधी अहवाल सादर करा : केजरीवाल सरकारचे तिन्ही महानगरपालिकांना आदेश

चंद्र प्रकाशाबरोबर रात्री उमलते कुमुदिनी

व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका कुमुदिनीचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे फुल चंद्रप्रकाशाबरोबर रात्री उमलते. परंतु, ते अवघे 48 तासच टिकते. पहिल्या रात्री ते पांढर्‍या रंगाचे असते, तर दुसर्‍या रात्री त्यावर गुलाबी छटा येते. राणी व्हिक्टोरियाच्या नावावरून या कुमुदिनीचे नामकरण केले गेलेले आहे. हे फुल फुलल्यावर त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो.

सर्वांत आकर्षक कुमुदिनीचा पुरस्कार

ससिमॉन्थॉन ही सर्व पिवळ्या रंगातील जगातील सर्वात आकर्षक कुमुदिनी असून, तिला इंटरनॅशनल वॉटरगार्डनिंग सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेने 2021 सालचा सर्वात आकर्षक कुमुदिनीचा पुरस्कारही दिलेला आहे. आकर्षक रंगाबरोबरच वर्षभर दररोज दिवसा बर्‍याचदा जोडीने फुलणारी, बहुपाकळ्या असलेली, मोठ्या आकाराची व अतिशय सुगंधी अशी ही कुमुदिनी आहेे.

पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई अर्धवटच

 

Back to top button