सोलापूर : बोगस खतांचा साठा आढळलेल्या 'त्या' दुकानाचा खत विक्री परवाना निलंबित | पुढारी

सोलापूर : बोगस खतांचा साठा आढळलेल्या 'त्या' दुकानाचा खत विक्री परवाना निलंबित

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा बठाण ता.मंगळवेढा येथील समर्थ कृषी केंद्र मध्ये २५ बॅगा बोगस खतांचा साठा आढळला होता. या प्रकरणी दुकानाचा खत विक्री परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. असे वृत्त पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

विजय गुंडोपंत बळवंतराव यांच्या नावे सदरचे लायसन असून पुढील आदेश होईपर्यंत हे लायसन निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या आदेश जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी बजावला आहे. सध्या खताचा तुटवडा असल्याने बोगस खताची विक्री होत असल्याचे पंचायत समिती कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

बठाण येथे हे समर्थ कृषी केंद्र असून या दुकानात बोगस खते असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्याकडे केल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. तेथे डी.ए.पी. १८.४६.० खताच्या २५ बोगस बॅगा तपासणीत आढळल्या होत्या. या खताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच आला असून यामध्ये एन.पी.के. ची मात्रा १०० पैकी चार टक्के इतके असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी तक्रार निवारण समिती नेमण्यात आली असून त्यात तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे ,गुण नियंत्रण अधिकारी विनायक तवटे, कृषी विस्तार अधिकारी मधु किरण डोरले, आदींचा समावेश आहे.

तालुक्यामध्ये खते व बी बियाणे आढळल्यास या समितीकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. सदर सापडलेल्या खतांच्या पाच पोत्याची विक्री केली होती. या पोत्याची मूळ किंमत १२०० रुपये असताना तो दुकानदार १३७५ रुपयांना विकत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. हे खत विकताना प्रदीप फॉस्फेट ओडिसा कंपनीच्या बॅगा वापरल्या आहेत. याचा पंचनामा करून मे.न्यायालय दोषारोप पत्र लवकरच दाखल करण्यात येणार आहे. असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा, या पाच तालुक्यात बोगस खत साठा सापडल्याने कृषी खाते नेमके काय करते? असा संतापजनक सवाल शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button