सेालापूर : जि. प., पं. समितीसाठी 27 जूनला अंतिम गट रचना | पुढारी

सेालापूर : जि. प., पं. समितीसाठी 27 जूनला अंतिम गट रचना

सेालापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जिल्हा परिषदेच्या 77 आणि पंचायत समितीच्या 154 जागांसाठी 27 जून रोजी अंतिम गण आणि गट रचनेचे जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर तातडीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या द़ृष्टीने कामाला लागले आहेत.

मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणार्‍या 284 पंचायत समितींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग रचना करण्याचे स्पष्ट निर्देश या सुधारित आदेशामध्ये देण्यात आले आहेत. प्रभाग रचनेचे अधिकार एकप्रकारे राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाने स्वतःकडे घेतले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळा पत्रकांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी 23 जून पर्यंत प्रारुप गण आणि गट रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावे लागणार आहे.

त्याला 31 मे पर्यंत विभागीय आयुक्त मान्यता देणार आहेत तर प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवर 2 जुन रोजी प्रसिध्द करणार आहेत. प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेवर 8 जूनपर्यंत हरकती व दावे मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती आणि दाव्यांची सुनावणी 22 जुन पर्यंत विभागीय आयुक्त घेणार आहेत.

येत्या 27 जूनरोजी अंतिम गण आणि गट रचना जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत.त्यानंतर तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे.

ओबीसी आरक्षणाचा तिढा आद्याप सुटलेलानाही यावर अनेक राजकीय पक्ष आणि राज्यशासन अक्रमक असले तरी सर्वाेंच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाव्यतिरिक्तच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही तालुक्यातील गण आणि गट कमी झाले आहेत तर काही तालुक्यातील जिल्हा परिषद गण नव्याने स्थापन झाले आहेत. तसेच गट ही वाढले आहेत.

त्यामुळे पूर्वी 68 जिल्हा परिषद गट होते ते आता 77 झाले आहेत.तर 154 पंचायत समिती गण झाले आहेत.त्यामुळे जिल्हा परिषदचे 9 सदस्य वाढले आहेत तर पंचायत समितीचे 18 सदस्य वाढले आहेत. ही गण आणि गट रचना करताना निवडणूक आयोगाने सन 2011 ची जणगनना गृहीत धरलेली आहे.

यामुळे त्यावेळी जिल्ह्याची एकुण लोकसंख्या 27 लाख 98 हजार 843 दाखविण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या 4 लाख 22 हजार 726 दाखविण्यात आली आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 47 हजार 906 दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे या निवडणुका आता सर्वसाधारण, महिला प्रवर्ग आणि अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातच होणार आहेत, हे निश्चित झाले आहे.

Back to top button