ग्लोबल गुरुजी रणजीत डिसलेंचा राजीनामा नामंजूर | पुढारी

ग्लोबल गुरुजी रणजीत डिसलेंचा राजीनामा नामंजूर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा माढा तालुक्यातील परितेवाडी येथील ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्‍त शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींनी काही दिवसांपूर्वी दिलेला शिक्षक पदाचा राजीनामा शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी नामंजूर केला. रणजितसिंह डिसले गुरुजी व शिक्षणाधिकारी डॉ.लोहार यांच्यात काही दिवसापांसून सातत्याने वाद सुरू होता. डिसले गुरुजी यांची वेळापूर येथील प्रशिक्षण केंद्रात प्रतिनियुक्‍ती असताना त्यांनी या ठिकाणी हजर न होताच तीन वर्षे पगार घेतल्याचा ठपका पान 2 वर

शिक्षण विभागाच्या चौकशी समितीने ठेवला होता. याशिवाय अनेक आरोप करुन डिसले यांना सतत चौकशीच्या फेर्‍यात गुरफटवले जात होते. त्यामुळे त्रासलेल्या डिसले यांनी महिनाभरापूर्वीच शिक्षणाधिकार्‍यांकडे चारशे पानांचा खुलासा देत राजीनामा सादर केला होता.
अमेरिका येथील फुलब्राईट संस्थेकडून डिसले गुरुजी यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ते 8 ऑगस्ट 2022 रोजी अमेरिकाला जाणार आहेत.

तत्पुर्वीच त्यांनी शिक्षक पदाचा राजीनाम दिला होता. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेत आपली बाजू मांडली होती. प्रतिनियुक्‍तीच्या ठिकाणी हजर न होताच वेतन घेतल्याने याप्रकरणी शिक्षण विभागाकडून डिसले गुरुजी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्‍त करण्यात येत होती. मात्र या प्रकरणाचा वाद थेट मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यापर्यंत गेल्याने याप्रकरणी जि. प. प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे.

Back to top button