सोलापूर : गूळ पावडर कारखानेही डीसीसीच्या रडारवर | पुढारी

सोलापूर : गूळ पावडर कारखानेही डीसीसीच्या रडारवर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : विजय शुगर आणि आर्यन शुगरच्या लिलावानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेल्या गोंविद पर्व आणि ज्ञानेश्वर मोरे गूळ पावडर कारखान्याच्या प्रॉपर्टीचा लिलाव करून वसुली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विजय शुगर साखर कारखाना विक्री केल्यानंतर डीसीसी बँकेला 125 कोटी मिळाले. परंतु, अद्याप काही रक्कम येणे बाकी आहे. तर आर्यन शुगर साखर कारखान्याला 360 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. परंतु, साखर कारखाना विक्री केल्यानंतर 68 कोटी रुपयेच डीसीसीला मिळाले. आणखी 289 कोटी रुपये डीसीसीकडे आल्यानंतर वसुली होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्याकडे अद्यापही 360 कोटी रुपयांच्या आसपास पैसे बँकेला जमा होणे बाकी आहे. तरी डीसीसी बँकेने दिलेला पैसा हा सर्वसामान्य शेतकर्‍यांचा आहे. तो पैसा वसूल झाला पाहिजे, यासाठी 91 कायद्यांतर्गंत सहकार न्यालयाचा मार्ग स्वीकारला जात आहे.

दरम्यान, करमाळा तालुक्यातील गोविंद पर्व या गूळ पावडर कारखान्याला बँकेने 10 ते 12 कोटी रुपये दिले होते. तर ज्ञानेश्वर मोरे या गूळ पावरड कारखान्यालही 10 ते 12 कोटी रुपये दिले होते. या रक्कमा वसुलीसाठी सध्या कायदेशीर बाबी पूर्व करून ही हातातील प्रॉपर्टी विक्री करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी आदित्यराज गुळ पावडरची विक्री करून डीसीसीला 20 कोटी रुपये मिळाले होते. परंतु, या आदित्यराजला बँकेने जवळपास 30 ते 35 कोटी रुपये दिले होते. त्यामुळे आणखी जवळपास 10 कोटी रुपये या आदित्यराजकडे वसुली होणे बाकी आहे.

बड्या थकबाकीदारांच्या वसुलीला वेग

मागील काही दिवसांपूर्वी बड्या थकबाकीदारांकडील वसुली थांबली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये डीसीसी बँकेने ताब्यात असलेल्या विजय शुगर, आर्यन शुगर, आदित्य राज गुळ पावडर आणि आणखी दोन गुळ पावडर विक्रीच्या रडारवर आहेत. त्यामुळे प्रशासक यांनी बड्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी तगादा लावला असल्याचे दिसत आहे.

Back to top button