बोपले येथे विविध विकासकामांचे उद्घाटन | पुढारी

बोपले येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

अनगर : पुढारी वृत्तसेवा माजी आमदार राजन पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी विक्रमी निधी खेचून आणला आहे. यापुढील काळातही निधी खेचून आणण्यासाठी सातत्याने कसोशीचे प्रयत्न सुरूच राहतील अशी ग्वाही मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी बोपले तालुका मोहोळ येथे बोलताना दिली. बोपले येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते आणि लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेे. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार माने बोलत होते.

यावेळी बोपले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मिळावा, म्हणून सातत्याने प्रयत्नशील असलेले लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील आणि आमदार यशवंत माने यांचा सत्कार बोपले ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी जगन्नाथ कोल्हाळ,नानासाहेब ढवण, शशिकांत कोल्हाळ, बाबा पाटील, दयानंद राऊत,आत्माराम करंडे, बाळासाहेब पाटील, रोहन देशमुख, शुक्षण ढेरे, रवींद्र देशमुख, विजय करंडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button