श्रावणानिमित्त गौडगाव मारुती मंदिरात कार्यक्रम | पुढारी

श्रावणानिमित्त गौडगाव मारुती मंदिरात कार्यक्रम

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवागौडगाव (ता. अक्कलकोट) येथील दक्षिण मुखी जागृत मारूती मंदिरात श्रावनमासनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदीर ट्रस्टीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी दिली. जागृत मारुती मंदिरात महिनाभर चालणार्‍या श्रावणमासच्या शनिवार, दि. 30 तारखेपासून विविध व विशेष कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. जागृत मारूती मंदीरात सायंकाळी 9 ते रात्री 1 वाजेपर्यंत विविध धर्मिक, सामाजीक,भजन, किर्तन होणार आहे.

श्रावणमास निमित्त 30 तारखेपासून मारुतीमंदिरात रोज पहाटे 3 वाजेपासुन मारूतीस महारूद्राभिषेक, अभषेक, नवग्रह पुजा, शनिपूजा व होमहवन यज्ञचा कार्यक्रम होणार आहे. राज्य व परराज्यांतून येणार्‍या भाविक भक्तांना दर्शनाची सुलभ सोय व्हावी, म्हणून योग्य ती खबरदारी मंदिर ट्रस्टी घेणार आहे. येणार्‍या प्रत्येक भाविकांना मंदिर समितीकडून हानुमान चाळीसा व मारूतीचे प्रतिमा देण्याची सोय केली आहे. मंगळवार व शनिवार दुपारी 12 वाजता विशेष महाआरतीचा कार्यक्रम पार पडेल, या महाआरतमध्ये रांगेत प्रथम उभे असलेल्या भक्तना मान मिळेल, गौडगांवचे मारुती हे दक्षिणमुखी आहे.

या मारुतीचे दर्शन घेतल्याने शारीरिक, मानसिक, इडा-पिडा दुर होतो. व मनातील इच्छा व मनोकामना पूर्ण होतो. अशी भक्ताची श्रद्धा आहे. नवसाला पावणार्‍या या मंदिराची महती राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचल्यानेच महाराष्ट्र, कर्नाटक, आध्रप्रदेश व देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होणाचा अंदाज आहे. महिनाभर चालणार्‍या कार्यक्रमात भक्तांना कोणतेही त्रास होऊ नये, म्हणून सर्वपरीने सुख, सुविधा, व व्यावस्था करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी गौडगांव अन्नछत्र मंडळात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू राहणार आहे. तरी मारुती भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत खानापूरे यांनी केले आहे. मारुती कार्यात मोलाचे सहकार्य करून देणगीरूपाने अन्नछत्रास आपले आशीर्वाद मिळावेत, अन्नदान सेवेस व चाललेल्या समाजकार्यास सढळ हाताने सहकार्य करुन या मारुतीसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Back to top button