‘सिद्धेश्वर’मधील मुलींना विषबाधा | पुढारी

‘सिद्धेश्वर’मधील मुलींना विषबाधा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सिद्धेश्वर वूमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकल मधील जवळपास 15 ते 20 मुलींना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. सिद्धेश्वर वूमन्स पॉलिटेक्निकमधील विद्यार्थिनी तेथीलच वसतिगृहात राहतात. त्यांनी रात्री जेवण केले. जेवणामध्ये छोलेची भाजी होती. रात्री अडीच वाजेपर्यंत मुलींना झोपेअभावी असलेल्या मुलींना त्यानंतर पोटदुखीचा त्रास होऊ लागला. काही मुलींना उलट्या व जुलाबही होऊ लागले. त्रास कमी होत नव्हता.

पहाटेच्यावेळी कार्यरत रेक्टरनी त्या मुलींना सोलापुरातील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. खासगी रुग्णालयाजवळ पालकांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीच्या जेवणातून या मुलींना विषबाधा झाली का याबाबत पोलिस तपासातून योग्य ती माहिती पुढे येईल. त्या वसतिगृहातील किती विद्यार्थ्यांना विषबाधा झाली याची माहिती अद्यापही स्पष्ट झाली नाही.

Back to top button