कुंभार समाजाने आदर्श निर्माण करावा : कुंभार | पुढारी

कुंभार समाजाने आदर्श निर्माण करावा : कुंभार

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा कुंभार समाजातील गुणवंतांनी चांगले शिक्षण घेऊन आदर्श व्यक्ती बनावे. प्रामाणिकपणे अभ्यास करावा. कर्तृत्व सिद्ध केल्यास समाज नक्कीच पुढे जातो, असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले. नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे कार्यक्रम पार पडला. कन्‍नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी अण्णाराव कुंभार बोलत होते.

प्रथम श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी व तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, प्रा. धर्मराज कुंभार, गुरुराज तावसे, खजिनदार ललिता कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंबादास चाबुकस्वार, माजी प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, लेखाधिकारी महेश आळंगे, माजी प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर, शिक्षण निरीक्षक बरगली सोनकडे, राजूर विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन धर्मराज बळ्ळारी, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुंभार समाजातील 60 गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुशांत धुत्तरगावकर, धर्मराज कुंभार, गुरुराज तावसे, माजी प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार कुंभार यांनी केले. मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी आभार मानले. यावेळी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, विठ्ठल कुंभार, लक्ष्मीकांत त्रिसुले, चंद्रशेखर पाटील, रेवणसिद्ध दसले, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवृंद यावेळी उपस्थित होते.

Back to top button