पत्रकार, पोलिसांसाठी सर्वरोग निदान शिबिर | पुढारी

पत्रकार, पोलिसांसाठी सर्वरोग निदान शिबिर

टाकळी सिकंदर : पुढारी वृत्तसेवा कै. बाळासाहेब ठाकरे वैद्यकिय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ तालुक्यातील पत्रकार व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वरोग निदान शिबिर झाले. या शिबिरात 100 जणांची तपासणी करण्यात आली तसेच उपलब्ध असणार्‍या औषधांचेही वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू करण्यात आलेल्या कै. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे यांच्या संकल्पनेतून कार्यरत असणार्‍या या वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील पत्रकार व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोहोळ शहरातील गावडे हॉस्पिटल येथे तालुका वैद्यकिय समन्वयक सुरज जम्मा यांनी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते.

सोलापूर येथील नोबल हॉस्पिटलचे डॉ. अमजद सय्यद, गावडे हॉस्पिटलचे डॉ. समाधान गावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण गुरव आदींच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ.अमजद सय्यद, अस्थीरोग तज्ञ डॉ.निखिल श्रीराम, डॉ.प्रीतम नरखेडकर, डॉ.समाधान गावडे, डॉ.सरोज बॉम्बेवाला आदींनी अस्थीरोग,हृदयरोग, किडनी,रक्त तपासणी, ई.सी.जी. याविषयी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरासाठी नोबल हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी निलेश गवंडी व गावडे हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. यावेळी मोहोळ तालुका पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

Back to top button